ok. आज लिहूया blog. म्हणजे , लिहिण्यासरखं काही विशेष घडलं वगैरे नाहीये, तरीही!! आता तुम्हीच सांगा , माझ्या साध्याश्या आयुष्यात काय घडणार?
नाही म्हणायला, आजची वेगळी घटना येवढीच की, गाडी inspection ला fail झाली आणि आता emergency break fix करुन ती पुन्हा inspection ला न्यायला हवी आहे.
माझ्या आयूष्यात तेवढच जरा thrill !! आता माझ्या गाडीवर Rejected असा लाल रंगाचा sticker आहे आणि त्यामुळे गाडी चालवताना मला रस्त्यवरचे सर्व पोलिस माझ्या गाडीकडेच बघत आहेत आणि मी एखाद्या सरावलेल्या criminal सारखी त्यांच्या नजरेतून बचाव करत माझी गाडी पळवते आहे असं वाटतय.
आपल्या साध्या सरळ आयुष्यात यापेक्षा थरारक असं काही नाही बूवा घडत.मला जाम हेवा वाटतो त्या माणसांचा ज्यांच्या जिवनात सतत काही ना काही आपलं विषेश घडत असतं.
म्हणजे , प्रेमात पडतात आणि मग बाहेरही पडतात, म्हणजे मग , ह्रदयभंगाच्या वगैरे गोष्टी सांगतात.
आम्ही प्रेमात पडलो आणि बाहेर वगैरे पड्ण्यापूर्विच लग्नाताच पडलो. आता, आई-वडीलांनी विरोध बिरोध केला असता तरिही थोडं thrill वाटलं असतं, पण कसंच काय, त्यांनीही अगदी हसत हसत परवानगी दिली. कदाचित स्थळं बघायची पायपीट वाचली याचाच त्यांना जास्ती आनंद झाला असावा.....anyway !!! नशिब आमचं.
तर चित्त्तथरारक प्रेमकथा वगैरे होण्याचा chance तसा हूकला.
झालच तर , लोकांच्या शेजारी अगदी कजाग माणसं रहातात, त्यांचे रोज काही ना काही किस्से असतात. आमच्या आजूबाजूला सर्वजण साबरमती आश्रमाची life membership घेतल्यासारखे वागतात.आणि चूकून माकून राहीलेले american आहेत , त्यांना बापडयांना पहिली बायको/नवरा , दुसरीच्या पहिल्या लग्नाची मुले, पहिल्या बायकोचा दूसरा नवरा इत्यादी इत्यादी भानगडींमधून माझ्याशी hi/hello करण्यापलिकडे फारसा वेळ नसतो. तर ते असो.
नाहीतर काही महाभाग दर weekend ला कसल्या ना कसल्या तरी adventure ला जातात, skiing, camping, rafting ... हे नाही तर ते ... असोत बापडे. आमच्यासाठी weekend ला संपूर्ण आठवड्याचं घरकाम संपवण्याचं एक मोठं challange असतं [अर्थात, हे माझ्या आळशीपणावर पांघरूण घालायला दिलेलं निमित्त आहे , हे तूम्ही चतुर लोकांनी ओळखलच असेल]
तेव्हा खरं म्हणजे, या गाडीवरच्या लाल sticker ने मी तर खुपच excite झालेय. आता, गाडी repair करुन Passed चा sticker लागेपर्यंत मी , माझ्या सात पिढ्या Toni Soprano च्या घरी driving करत होत्या अश्या अविर्भावात , पोलिसांच्या नजरेतून बचाव करत चालवणार. आणि त्यातून जर का मामाने पकडलंच तर, तो किस्सा मला पुढ्चे पाच-सहा महीने तरी पार्ट्य़ामध्ये सांगयला पूरेलच की........
Subscribe to:
Post Comments (Atom)
9 comments:
’ साबरमती आश्रमाची life membership’ खास वाक्यं आहे, तेजू !
तुला अजून थरारक काही करायचं असेल तर speeding ticket हा option आहेच !!
माझ्याकडेही एक इन्स्पेक्शनचा किस्सा आहे.. पार्टीत भेटल्यावर सांगीन !
cool....could be have been more funnier - Kiran
छान लिहिले आहेस.
I had an idea that you should be able to write good..because of your background and senitivity.
good..
छान लिहिले आहेस....इथल्या पार्ट्या आणि weekends.
why dont you write some thing abt "जेवण, RETURN करणे" Funda in USA ...अग्दी Coffe पण "Returnable" असते :)- राजन.
thanks kiran... for typical "नवरा comment"....no really .... thanks for reading ....
संदीप,
thanks , not only for the comment but for encouraging me to write.
आता भोगा आपल्या कर्माची फळं....
Hilarious, Amusing ....
Very Good Writing.
Putting up with neighbours of "Sabarmati Ashram membership" is no less of a thrill though....
- Ravi Khanapure
- Gayatri Khanapure
Good start, Tejoo.
Keep it up !
Rajeshree
मस्त
छान आहे सुरवात... अजुन येउं दे असेच!
Post a Comment